लोरे नंबर 2 मध्ये विविध विकास कामांचे सिद्धेश रावराणे यांच्या हस्ते भूमिपूजन

पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विकासगंगा; सरपंच विलास नावले यांचा पाठपुरावा

वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या विकासनिधीतून लोरे नं. 2 गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन सिद्धेश उर्फ बंटी दिलीप रावराणे यांच्या हस्ते आज करण्यात आले. जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांच्या प्रयत्नातून आणि लोरे नं. 2 सरपंच विलास नावले यांच्या पाठपुराव्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गावातील 3 रस्त्यांसाठी 17 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सिद्धेश रावराणे यांच्या हस्ते आज या रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. जनसुविधा योजनेतून लोरे नं. 2 गावातील सकपाळवाडी येथील विठ्ठल मंदिर समोरून जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करणे यासाठी 5 लाख रुपयांचा निधी प्राप्त आहे. मांजलकर वाडीतुन मांजलकरवाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करण्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी प्राप्त आहे. तसेच ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोगातून मोहन मांजलकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता खडीकरण करणेसाठी 2 लाख असा एकूण 17 लाख विकासनिधीच्या विकासकामांचे भूमिपूजन आज झाले. यावेळी लोरे नं. 2 सरपंच विलास नावले, ग्रामपंचायत सदस्य रितेश सुतार, प्रकाश गव्हाणकर, भरत मांजलकर, दत्ताराम कदम, गुरुराज डोंगरे, अण्णा मांजलकर, शिवाजी कदम, दिगंबर पाणकर, नाना रावराणे, छोटू रावराणे, ज्ञानेश्वर सकपाळ, बाळा सकपाळ, नारायण म्हादये आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!