पर्यटन प्रवेशद्वारावरील संवेदनशील फोंडाघाटचे पोलीस आऊट पोस्ट येथे जादा पोलीस कॉन्स्टेबलची नेमणूक करावी – ग्रामस्थांची आग्रही मागणी

ग्रामस्थांना हेलपाट्यांचा त्रास ?

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील संवेदनशील आणि घाट पायथ्या जवळील फोंडाघाट गावात, असलेल्या “पोलीस आउट पोस्ट” मध्ये गेले तीन-चार महिने फक्त हेडकॉन्स्टेबल पदावर एकच पोलीस काम पहात आहेत. वरिष्ठांकडून त्यांना कामगिरीवर, कार्यालयीन कामकाजासाठी यामुळे अन्यत्र ड्युटी करावी लागते. त्यात त्यांची सुट्टी त्यामुळे आठवड्यातून तीन-चार दिवस पोलीस आऊट पोस्ट बंद असते. गावातील तंटे, घाटातील अपघात, शांतता सुव्यवस्था, बाजारपेठेतील वाहतूक कोंडी, ग्रामीण भागातील तक्रारी इत्यादी आणीबाणीच्या वेळी आऊट पोस्ट येथे कोणीही नसते. त्यामुळे येथील नागरिकांना पोलीस स्टेशनला हेलपाटे घालावे लागतात. ग्रामीण भागात जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो. अथवा १५ किमी कणकवली येथे जावे लागते.

या पुर्वी या ठिकाणी दोन पोलीस स्टाफ असल्याने येथे एक जण उपस्थित असे. याबाबत सरपंच – ग्रामपंचायत व स्थानिक यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब गांभीर्याने घातली आहे. मात्र अपुऱ्या स्टाफचे कारण देत वरिष्ठांनी दुसरा स्टाफ कॉन्स्टेबल देण्यास दिरंगाई चालविली आहे. त्यामुळे गावात अवैध धंद्यांना राजरोज उत आला आहे आणि ग्रामस्थांना त्रास सहन करून हेलपाटे घालावे लागत आहेत. तरी वरिष्ठांनी फोंडाघाट आऊट पोस्ट येथे दोन पोलिसांची तातडीने नेमणूक करून दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी जोर धरत आहे.

error: Content is protected !!