मालवणात भाजपाच्या पदाधिकारी यांचा रात्रीस खेळ चाले

मालवण पोलिसांनी पकडली भाजपा पदाधिकाऱ्यांच्या गाडीत रोख रक्कम

मालवण (प्रतिनिधी) : रात्री प्रचार संपल्यानंतर उशिरा पोलिसांच्या नाकाबंदी वेळी देवगड भाजपा तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या MH-07- AS-6960 या वाहनामध्ये नाकाबंदी वेळी पोलीसांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली.

मालवण पोलिसांनी सदर वाहन अधिक तपासासाठी मालवण पोलीस ठाणे येथे आणले असता मालवण येथील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब व अजिंक्य पाताडे यांनी नंबर प्लेट नसलेली कार घेऊन पोलीस ठाण्यात येऊन सदर प्रकरण मिटविण्यासाठी हस्तक्षेप करत असल्याचे समजताच आमदार निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यामुळे पोलीस ठाण्यातील वातावरण तंग झाले. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातुन मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा आमदार निलेश राणे यांनी घेतला.

error: Content is protected !!