पांडुरंग तिर्थे जाऊ आपण | नाम संकीर्तने न्हाऊ – वारीचा एक अविस्मरणीय अनुभव !

फोंडाघाट श्री देव गांगोमाऊली वारकरी संप्रदायाच्या माघी पायी वारीचे ता. १९ जानेवारी रोजी प्रस्थान !

कोकण दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : आषाढी- कार्तिकी या वारी प्रमाणे विशेषता कोकणात माघी वारीचे फार महत्त्व आहे. भातकापणी, वारवणी, साठवणी — कामातून मोकळा झालेला शेतकरी, ” पांडुरंग तीर्थे जाऊ आपण | नाम संकीर्तने न्हावु “या विठ्ठलमाऊलीच्या ओढीने वारीतून अविस्मरणीय ऊर्जा प्राप्त करतो. कोकणातील अनेक मंडळाच्या माध्यमातून पायी वारीचे दरवर्षी नियोजन करण्यात येते. श्री देव गांगोमाऊली वारकरी संप्रदाय, फोंडाघाटच्या वतीने सलग चौथ्या वर्षी माघी पायी वारी (कोकण दिंडी) फोंडाघाट ते पंढरपूर पर्यंत गुरुवर्य वै. हभप विवेकानंद महाराज वास्कर यांच्या आशीर्वादाने, काढण्यात येते.

चालू वर्षी श्री माऊली मंदिर येथून श्री देव राधाकृष्ण मंदिर,मारुती मंदिर मार्गे फोंडाघाट मधून तारीख १९ जानेवारी २६ रोजी वारीचे प्रस्थान होणार आहे. या पायी वारी- दिंडीत पंचक्रोशीतून सहभागी होण्यासाठी श्री भाई सावंत – ७८२१९५८३४९आणि संजय पांचाळ – ७७९८६८०४५८ यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन संप्रदायाकडून करण्यात आले आहे.

दरवर्षी धार्मिक, सांस्कृतिक परंपरेची श्रद्धापूर्वक वारीत कित्येक महिला, पुरुष या वारीमध्ये सहभागी होतात. वाटेल वाटेल भजन कीर्तन नृत्य टाळ मृदंगाच्या नामस्मरणात आपल्या दैनंदिन जीवनात विसरतात काहींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन ज्ञानेश्वर तुकारामाच्या पादुका खांद्यावर पताका आणि मुखी माऊलीचा जयजयकार यामुळे एक अनामिक ऊर्जा प्राप्त होते असा वारकऱ्यांचा विश्वास आहे ही दुर्दम्य हा दुर्दम्य सोहळा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन ह भ प भाई सावंत आणि ह भ प राजा पाटकर यांनी केले आहे

error: Content is protected !!