फोंडाघाटचा अभिमान, सिल्वर मेडल विजेता, बॉडी बिल्डर अमित कदम चे फोंडाघाट येथे विविध स्तरावर अभिनंदन!

फोंडाघाट (प्रतिनिधी) : थायलंड मधील बँकॉक येथे “वर्ल्ड बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस चॅम्पियनशिप” या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवणारा अमित कदम याचे फोंडाघाट येथे आगमन होताच, विविध स्तरावर अभिनंदन करून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. फोंडाघाट मेडिकलमध्ये ज्येष्ठ व्यापारी बबन पवार यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन आणि सुरेश टक्के यांचे हस्ते केक भरवून त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कुमार नाडकर्णी, राकेश टक्के, गायत्री गारमेंट मालक व प्रमोद शिरोडकर इत्यादी उपस्थित होते. जगात आपला भारत देश सर्वांग सुंदर आणि श्रेष्ठ असल्याची भावना, अमित कदम यांनी यावेळी व्यक्त केली.

error: Content is protected !!