श्री.साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट 23 वा वर्धापदिन दिन उत्सव सोहळा 27 एप्रिल रोजी

कणकवली (प्रतिनिधी): श्री.साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट 23 वा वर्धापदिन दिन उत्सव सोहळा निमित्त गुरूवार 27 एप्रिलला श्री. साईनाथ मंदिर कुपवडे येथे साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने श्री. दत्त याग यज्ञ आयोजित विविध कार्यक्रमाचे आयोजन पहाटे 5.30 वा. बाबांची काकड आरती, सकाळी 6.30 वा. अभिषेक व साईबाबांची आरती, सकाळी 8 ते 11.30 श्री. दत्त याग यज्ञ, दुपारी 12.00 वा.मध्यान्ह आरती, दुपारी, 12.30 वा. महाप्रसाद (साई भंडारा), सायं.5.30 वा. बाबांची मिरवणुक, सायं.7.30 ते 9.00 वा. सुस्वर भजन व किर्तन, रात्रौ ठीक 9.00 वा. बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य प्रयोग ” वेडा चंद्रहास ” सादर होणार आहे. तरी साई दर्शनाला भाविकांनी उपस्थित राहावे आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.असे आवाहन अध्यक्ष काशीराम परब शेठ तसेच उपाध्यक्ष प्रतीक काशीराम परब यांनी केले आहे.

error: Content is protected !!