बर्वे ग्रंथालयात जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन

देवग्स (प्रतिनिधी): येथील उमाबाई व प्रथालयायतीने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन शेठ म. ग. हायस्कूलचे शिक्षक प्रविण खडपकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खडपकर यानी २३ एप्रिल हा विख्यात साहित्यिक विल्यम शेक्सपीयरचा स्मृतीदिन म्हणून ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा केला जातो. या दिनानिमित्त जगातील सर्व नामवत लेखकाना आदरांजली वाहण्यात येते. पुस्तके ही जगण्याची अनुभुती देतात. पुस्तकामुळे अनेक विचारवताना प्रेरणा मिळाली आहे. लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाचे विविध भाषामधून अनुवाद होत असतात त्यामुळे साहित्याच्या कक्षा रूंदावतात आणि लेखन कला विकसित होते. समाज वाचनाभिमुख करण्यासाठी ग्रंथालयांनी जास्तीत जास्त वाचक चळवळ वृध्दिंगत करावी, असे ते म्हणाले. ग्रंथालयाचे संचालक सदस्य सीताराम पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष सागर कर्णिक सचिव संजय धुरी, संचालक सदस्य श्री दत्तात्रय जोशी उपस्थित होते. अथालयाचे अध्यक्ष कर्णिक यांनी प्रास्ताविक केले व हे ग्रंथप्रदर्शन २९ एप्रिल पर्यंत सर्वासाठी खुले राहिल. ग्रंथालयाच्या सर्व वाचकांनी या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे सांगितले. आणि कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ग्रंथालयाचे वाचक वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!