चौके ग्रामपंचायतीच्या वतीने आज आयोजन
चौके (प्रतिनिधी) : आपला जिल्हा स्वच्छ जिल्हा व पर्यटन जिल्हा म्हणून देशात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात असंख्य पर्यटक भेटी देत असतात. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मंदिर परिसर देवस्थाने धार्मिक स्थळे येथेही पर्यटक भाविक आणि ग्रामस्थांची ये-जा असते म्हणून मंदिर परिसरामध्ये कचरा, प्लास्टिक कागद, कोरडे गवत, पान फुलांचे अवशेष इत्यादींचा साठा वाढत जातो. अशा परिस्थितीत पर्यावरणीय स्वच्छता सार्वजनिक आरोग्य सौंदर्य करण तसेच धार्मिक पावित्र्य या सर्व दृष्टीने मंदिर परिसर स्वच्छ आणि पवित्र राहणे एक केवळ धार्मिकदृष्ट्यात नव्हे तर समाज आरोग्य पर्यटन विकास आणि ग्रामविकासाच्या दृष्टीकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतीना दिलेल्या सूचनेनुसार मंगळवार दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळच्या सत्रात मंदिर परिसर स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन श्रमदानातून करण्यात यावे असे कळविले होते. त्यानुसार मंदिर देवस्थान कमिटी गावातील पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी या स्वच्छता मोहिमेत चौके सरपंच पी. के. चौकेकर ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष नितीन गावडे, देवस्थान कमिटीचे पदाधिकारी पत्रकार संतोष गावडे, बिजेंद्र गावडे, दत्ता गावडे, ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, आशा स्वयंसेविका सिद्धाली गावडे, माजी सरपंच सचिन आंबेरकर, माजी सरपंच मधुकर चौकेकर, ग्रामपंचायत अधिकारी सरमळकर, महेश सावंत, अनिकेत घोगळे, उदय गावडे, रामचंद्र बुधाजी चौकेकर, अनंत चौकेकर, नामदेव चौकेकर, शिवाजी गावडे, हरिश्चंद्र गावडे, संजय गावडे, संजय गावडे, ग्रामपंचायत कर्मचारी आनंद सावंत, दीपक चौकेकर, गोपी मांजरेकर, गुरूप्रसाद गावडे आदी सहभागी झाले होते.











