दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमांसह पारितोषिक वितरण सोहळा होणार संपन्न
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल आणि कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ७ वाजता सुरू होणार आहे. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे उपस्थित रहाणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष सदानंद रावराणे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. उमेश सावंत उपस्थित रहाणार आहेत. याशिवाय वैभववाडी तहसीलदार सुर्यकांत पाटील, पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, महामार्ग पोलिस केंद्र खंडाळा, लोणावळा पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, बि. शे. ना. सह पतसंस्थेचे चेअरमन शांताराम रावराणे, नगरपंचायत वाभवे-वैभववाडी च्या नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदिप रावराणे, महिला बालविकास सभापती दर्शना पवार, वीत्त व बांधकाम सभापती रणजीत तावडे, शिक्षण-आरोग्य व क्रीडा सभापती रोहन रावराणे व सर्व विषय समितीचे सभापती व नगरसेवक यावेळी उपस्थित रहाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमासह शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा, परिक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने प्रशालेच्या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ऐतिहासिक नाट्य ‘राजा शिवछत्रपती’ ही कलाकृती हे या स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभास वैभववाडी तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी व हितचिंतकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व मुख्याध्यापक बी. एस. नादकर, स्नेहसंमेलन प्रमुख पाटील. पी. ए., सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. जाधव, ए. एस. परिट, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष तेजस आंबेकर, माता पालक संघ उपाध्यक्ष स्वराली कोलते, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी हर्ष जांभळे, निहारिका पाटील, वैष्णवी चव्हाण व वैष्णवी हावळ यांनी केले आहे.












