महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटिक राज्यस्तरीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र मनीष भालेकर यांची यशस्वी कामगिरी

१ सुवर्ण व ३ रजत पदकासह जबलपूर,मध्यप्रदेश येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई येथील सोमय्या विद्याविहार विश्वविद्यालयाच्या ॲथलेटिक ट्रकवर नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटिक स्पर्धेत मुळगाव चिंचवली ता. कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग चे सुपुत्र व सध्या वरळी मुंबई येथे वास्तव्यास असणारे मनीष भालेकर यांनी १ सुवर्ण व ३ रजत पदक जिंकत यशस्वी कामगिरी केली असून त्यांच्या या सुवर्णयोगी कामगिरी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. तर जबलपूर, मध्यप्रदेश येथे दि. १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ च्या दरम्यान जबलपूर, मध्यप्रदेश येथे होणाऱ्या पुढील राष्ट्रीय सर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.

मनीष भालेकर यांनी मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीत ५०० मीटर जलद चालण्याच्या कठीण शर्यतीत ३६ मिनिटे एवढा वेळ घेऊन दुसरे स्थान पटकावत सिल्व्हर पदक जिंकले आहे. तसेच त्यांनी लांब उडी स्पर्धेत देखील सहभाग घेऊन ४ मीटर ३० सेंटी मीटर एवढी लांब उडी मारत प्रथम स्थान पटकावत सुवर्ण पदक जिंकले आहे.तसेच त्यांनी ट्रिपल जंप जी तांत्रिक दृष्ट्या कठीण असलेल्या स्पर्धेतही सहभाग घेऊन ९ मीटर १८ सेंटीमीटर (३० फूट ११ इंच ) इतकी लांब जंप मारत दुसरे स्थान पटकावत सिल्व्हर पदक जिंकले आहे. याबरोबरच मिक्स रिले ४/१०० या स्पर्धेमध्ये देखील संजय मोती, सरिता कदम,राजश्री वाडकर व मनीष भालेकर यांनी मिळून सांघिक द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. अशा प्रकारे मनीष भालेकर यांनी १ सुवर्ण पदकासह ३ रजत पदक जिंकले आहेत.

मनीष भालेकर यांची पुढे होणाऱ्या जबलपूर मध्यप्रदेश येथील ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून मनीष भालेकर हे उत्तम फुटबॉल खेळाडूही आहेत. ते ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटसाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रतियोगितेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. त्यांच्या या गौरवास्पद निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून मुंबई, वरळी करांबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची व गर्वाची बाब आहे.

error: Content is protected !!