टोपीवाला चषक २०२५ हॉलीबॉल स्पर्धेत त्रिंबक हायस्कूलच्या सोळा वर्षे मुली वयोगटाचे यश…!

आचरा (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील माणगाव हायस्कूल येथे १२ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झालेल्या टोपीवाला चषक २०२५ हॉलीबॉल स्पर्धेत जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या सोळा वर्षे मुली वयोगटाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. त्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अन्ना सपकाळ, सचिव अरविंद घाडी सर्व संचालक वर्ग मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक ग्रामस्थ सर्वांनी अभिनंदन केलं क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!