आचरा येथे १७ जानेवारी रोजी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा….!

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराचे आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचराने शनिवार दि. १७ जानेवारी २०२६ रोजी दु.ठिक २.३० वाजता श्री रामेश्वर सार्व. वाचन मंदिर व कै. महादेव भा. ठाकूर स्मरणार्थ श्रीम. विजयालक्ष्मी म. ठाकूर पुरस्कृत १० ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मालवण तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे तरी मालवण तालुक्यातील मुलामुलींनी या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन संस्थेच्या कार्यकारिणीने व सांस्कृतिक समितीने केले आहे.

स्पर्धेचे नियम व अटी
१) स्पर्धक गट- १० ते १४ वर्षापर्यंतचे विद्यार्थी.
२) विषय- कोणतीही प्रबोधनात्मक कथा.
३) वेळ- कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त ७ मिनिटे.
४) कथा संपण्यास १ मिनिट शिल्लक असताना सूचना बेल दिली जाईल.
५) स्पर्धका बरोबर पालकांनी हजर राहणे अनिवार्य आहे.
६) प्रथम येणाऱ्या फक्त १२ स्पर्धकांना प्रवेश.
७) बक्षिसे प्रथम क्रमांक-५००/- व्दितीय क्रमांक-४००/- तृतीय क्र- ३००/- तर उत्तेजनार्थ नं १) १००/- उत्तेजनार्थ नं २) १००/- ३) उत्तेजनार्थ १००/-

नाव नोंदणीची अंतिम तारीख दि. १२ जानेवारी दु. ठीक २ वाजेपर्यंत असून अधिक माहितीसाठी संस्थेच्या ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी मोबा. नंबर ९४२१२६३३४६ यावर संस्थेच्या कामकाजाच्या वेळेत (सकाळी १० ते दु. ४ वाजेपर्यंत) संपर्क साधावा. असे आवाहन श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!