एन एम एम एस गुणवत्ता शिष्यवृत्त्ती प्राप्त विद्यार्थीनी
आचरा (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील जनता विद्या मंदिर त्रिंबकची विद्यार्थीनी शर्वरी प्रशांत परब हिने एन एम एम एस गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. तिला नववी ते बारावी पर्यंत चार वर्षे दरवर्षी 12000 शिष्यवृत्ती असे शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. आज प्रशालेच्यावतीने तीचा सत्कार संस्थाध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर, शिक्षक– एकनाथ गायकवाड, महेंद्र वारंग, संतोष मेस्री, श्रीमती मेहेंदळे मँडम, मयेकर मँडम, घाडीगांवकर मँडम, गोसावी, धुरे आदी उपस्थित होते.












