” जीवनामध्ये शिक्षणाला खुप महत्व आहे “; प्रमोद गुरव, प्राध्यापक के आय टी महाविद्यालय कोल्हापूर
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलच्या सन – २०२५ – २६ या शैषणिक वर्षातील च्या इयत्ता १० वी च्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तथा सदिच्छा समारंभ नुकताच शुक्रवार दि.१३ फेब्रुवारी २०२६ रोजी हायस्कूलच्या कै.चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात संपन्न झाला.
संस्था अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला के आय टी महाविद्यालय कोल्हापूर चे सहायक प्राध्यापक श्री प्रमोद गुरव सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी खारेपाटण हायस्कूल च्या ७० व्या एस एस सी बॅच च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री गुरव म्हणाले की,” माणूस हा शिक्षणामुळे घडत असतो. जीवनामध्ये शिक्षण हे महत्वाचे असून विद्यार्थ्यांनी आपले करिअर करत असताना आपण कोणते शिक्षण घेणार आहोत याबरोबरच आपल्या अंगी असलेल्या उपजत गुणांचा शोध घेऊन त्या वृद्धिंगत करण्यावर भर दिला पाहिजे असे सांगितले.
या कार्यक्रमाला खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघाच्या नवनिर्वाचित सदस्य प्राची ईसवलकर,खारेपाटण पं.स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे,खारेपाटण हायस्कूलचे चे मुख्याध्यापक संजय सानप,पर्यवेशक संतोष राऊत, संस्थेचे उपाध्यक्ष भाऊ राणे,सचिव महेश कोळसुलकर,संस्थेचे संचालक दिगंबर राऊत,खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे,खारेपाटण जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नं.१ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर,खारेपाटण पतसंस्थेचे संचालक श्री संतोष पाटणकर,यश कॉम्प्युटर अकॅडमी चे संचालक मंगेश गुरव,खारेपाटण ज्युनियर कॉलेज प्राध्यापक अजय गुरसाळे, सुबोध देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित जि.प. सदस्य प्राची ईसवलकर व पं.स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांचा संस्था प्रशालेच्या वतीने अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तर खारेपाटण केंद्र शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत शाळेच्या आठवणींना उजाळा दिला.
या सदिच्छा समारंभ निमित्त जि.प सदस्य प्राची ईसवलकर,पं.स.सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांनी आपल्या भाषणात “आम्ही प्रथम या शाळेचे माजी विद्यार्थी असून नंतर आमची राजकीय पदे आहेत.त्यामुळे शाळेच्या उत्कर्षासाठी आपण नेहमीच प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.यावेळी प्रशालेचे प्राचार्य संजय सानप,अध्यक्ष प्रवीण लोकरे, मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, अजय गुरसाळे सर यांनी देखील आपली मनोगते व्यक्त कार्य करत इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना बोर्ड परिक्षेकरीता शुभेच्छा दिल्या.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ अमृते यांनी केले तर प्रास्ताविक श्री राऊत यांनी केले.व शेवटी सर्वांचे आभार श्री कापसे यांनी मानले.









