सुपुत्र देवांगसह अतुल रावराणे कुणकेश्वर चरणी लीन
कणकवली (प्रतिनिधी) : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवार निमित्त भक्तिमय वातावरणात पहाटेची पूजा संपन्न झाली. या पवित्र पूजेचा मान भैरभवानी प्रतिष्ठान चे अध्यक्ष, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अतुल रावराणे यांना लाभला. अतुल रावराणे यांनी सुपुत्र देवांग सह श्री कुणकेश्वर देवाचे मनोभावे दर्शन घेत पूजाअर्चा केली. याप्रसंगी देवस्थान समितीचे अध्यक्ष एकनाथ तेली देवस्थान समितीचे पदाधिकारी, मानकरी व ग्रामस्थ, रोहन रावराणे, राजू तावडे उपस्थित होते. श्री कुणकेश्वर देवाच्या चरणी कोकणवासीयांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि सर्वांगीण विकास कल्याणासाठी रावराणे यांनी मनोभावे प्रार्थना केली.










