शालेय विद्यार्थ्यांचा संस्कृत रामरक्षा पठण व अयोध्याधीश श्री राम दशावतार कार्यक्रमाचे विशेष आकर्षण
आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, १४ वा वर्धापनदिन सोहळा शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी बारापाच मानकरी व श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला असून यानिमित्त सकाळी ९ ते ११ शिवलिंगावर लघुरुद्र, सकाळी ११ ते १ सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ महिलांसाठी हळदीकुंकू, संध्याकाळी ५ ते ९ स्थानिक मंडळांची सुस्वर भजने/आरती, रात्रौ ९ ते १० वा. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण जिल्हा परिषद शाळा चिंदर भटवाडीचे इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी यांचे “सार्थ श्रीरामरक्षा स्तोत्र पठण” (संस्कृत), रात्रौ १० वा. वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ, तेंडोली यांचा महान पौराणिक ट्रिकसिन्स युक्त दशावतार नाट्य प्रयोग “अयोध्याधीश श्रीराम” सादर होणार आहे. तरी भाविक भक्तांनी, नाट्यरसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बारापाच मानकरी व श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ चिंदर यांच्या वतीने करण्यात आले आहे.









