महिला दिन विशेष : संत कान्होपात्रेची आर्त हाक आणि आजच्या मुलींचे वास्तव

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. मला आज आठवण होतेय महाराष्ट्रातील सुमारे सातशे वर्षांपूर्वीच्या संत कान्होपात्रा यांची. शामा नावाच्या वेश्येची ही बिनबापाची मुलगी. तिने विठ्ठलाला मारलेली आर्त हाक आज सातशे वर्षानंतरही गुंजते आहे. आमच्या काळजात विराजमान विठ्ठल तिच्यासाठी धावून जाईल का?

आजही मनुष्य पशूच्या कचाट्यात मुली सापडत आहेत. देहविक्रयाच्या बाजारात आणल्या जाणाऱ्या मुलींपैकी ७५ टक्के मुली या अल्पवयीन असतात.

नको देवराया अंत पाहू आता।
प्राण हा सर्वथा फुटो पाहे।।१।।
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले।
मज लागी जाहले तैसे देवा।।२।।
तुझविण ठाव न दिसे त्रिभुवनी।
धावे हो जननी विठाबाई।।३।।
मोकलिन आस जाहले मी उदास।
घेई कान्होपात्रेस हृदयात।।४।।

error: Content is protected !!