हेत येथील विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप

वैभववाडी (प्रतिनिधी) : हेत येथील फोंडके पाटील मराठा समाजाच्या वतीने केंद्रशाळा वि. म. हेत व न्यू इंग्लिश स्कूल हेत या दोन्ही शाळांतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्या व विविध शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी नवचेतना मित्र परिवाराच्या माध्यमातून केंद्रशाळा हेत येथे समाजकार्यातून उभारण्यात आलेल्या हॅन्डवॉश स्टेशनचे उद्घाटन न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक योगेश पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच किचन शेड दुरुस्तीसाठी लागणारी रोख रक्कम केंद्रशाळेचे मुख्याध्यापक संतोष मोरे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवानंद फोंडके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. किचन शेड इमारतीचे उद्घाटन मुख्याध्यापक संतोष मोरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास फोंडके पाटील मराठा समाजाचे अध्यक्ष अशोक फोंडके, कार्याध्यक्ष सुरेश फोंडके, नवचेतना मित्र परिवाराचे सदस्य रघुनाथ फोंडके व प्रवीण फोंडके यांच्यासह केंद्रशाळेचे शिक्षक गिते, श्रीमती कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उत्तम फोंडके, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक योगेश पांचाळ, श्रीमती शिंदे, श्री.आडे, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्रीधर फोंडके, ग्रामस्थ, शिक्षक, समिती सदस्य व दोन्ही शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!