बांदा नाबर प्रशालेत योग दिन साजरा

बांदा (प्रतिनिधी) : येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस शाळेच्या सभागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली योग केंद्र बांदाचे राजश्रीताई तेंडले, प्रियाताई नाटेकर, राखीताई कळंगुटकर, रिटा आलमेडा आणी स्नेहा नाईक योगशिक्षक हे उपस्थित होते.

शाळेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. प्रशिक्षकांनी योग प्रात्यक्षिकेही दाखवली. पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची प्रात्यक्षिके केली.

या वेळी शाळेचे शिक्षक उपस्थित होते. योगा दिनानिमित्त सकाळी सर्व विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारची योगासने व ध्यान करून घेण्यात आले . यावेळी मुख्याध्यापिका देसाई यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे महत्व सांगितले

error: Content is protected !!