बबली राणे यांची ठाकरे सेनेच्या कळसुली विभागप्रमुखपदी निवड

कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव चे माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांची शिवसेना उबाठा च्या कळसुली विभागप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार वैभव नाईक यांनी ही निवड केली आहे. शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या हस्ते बबली राणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख वैभव नाईक, कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, ओसरगाव माजी सरपंच प्रवीण कोलते,कणकवली शहरप्रमुख महेश कोदे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!