पीएमश्री श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे शाळेत योग दिन साजरा

कृषी महाविद्यालय सांगुळवाडीच्या कृषीकन्यांचाही सहभाग

वैभववाडी (प्रतिनिधी) : मुलांतील माणूस घडविणारी शाळा ही टॅगलाइन घेऊन कार्यरत असलेल्या तालुक्यातील पीएमश्री श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला मुख्याध्यापक प्रफुल्ल जाधव यांनी जीवनातील योगाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले. त्यानंतर ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषीमहाविद्यालय सांगुळवाडीच्या कृषीकन्या श्रेया जाधव, संकिता जंगम, श्रुती पाटील, समृद्धी म्हापुसकर, प्रतिक्षा राठोड यांनी वृक्षासन, त्रिकोणसन, ताडासन, पद्मासन, सूर्यनमस्कार, ध्यानधारणा आदींचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश बडमे, उपाध्यक्ष आरुषी काजरेकर, आकांक्षा जाधव, कोकिसरे आरोग्य उपकेंद्राचे समीर माने, मनिषा मिठबावकर, सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थांनीही प्रत्यक्ष सहभाग घेतला.

error: Content is protected !!