बांदा (प्रतिनिधी) : डोंगरपाल येथिल हॉटेल व्यावसायिक जयवंत उर्फ बालोआबा वासुदेव गवस (वय 77) यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. रविवारी सकाळी डोंगरपाल येथिल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते नाट्यकर्मी, क्रिडापटू तसेच भजनप्रेमी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.
हॉटेल व्यावसायिक जयवंत (बालोआबा) गवस यांचे निधन












