बांदा (प्रतिनिधी) : प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बांदा आळवाडा येथील साईभक्त कै. बाप्पा केसरकर संस्थापित श्री साई मठामध्ये गुरुवार दिनांक 26 मार्च रोजी श्री साई रामनवमी उत्सव उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. पूर्वसंध्येला बुधवारी रात्री 7 वाजता श्री देवी माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुली यांचा शिर्डी माझे पंढरपुर हा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
गुरुवारी 26 मार्च रोजी पहाटे पाच वाजता काकड आरतीने या सोहळ्याचा आरंभ होऊन दर्शनास सुरुवात होईल. दुपारी बारा वाजता मध्यान्ह आरती होईल. दुपारी दीड ते तीन श्री साईभंडारा महाप्रसाद होईल. सायंकाळी सात वाजता भजन होईल. रात्री नऊ वाजता शेजारती होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ आळवाडा – बांदा तसेच केसरकर परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.












