माजी विद्यार्थींनी उज्वला वंजारे यांच्याकडून पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिनी, फोंडाघाट-माळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप !

शाळेप्रती कर्तव्याचे पालक वर्गातून कौतुक !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : आपली शाळा फोंडामाळ- हवेलीनगर या शाळेची विद्यार्थिनी आणि विद्यमान देवगड – जामसंडे नगर पंचायत पाणी पुरवठा विभागाची सभापती तन्वी योगेश चांदोस्कर उर्फ उज्जला भास्कर वंजारे यांच्या मार्फत पालकमंत्री व मत्स व बंदर मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त फोंडा माळवाडी- हवेलीनगर शाळेत मुलांना मोफत दप्तरं वाटण्यात आली.

यावेळी उज्वला वंजारे यांनी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. शाळेचे पालक आणि ग्रामस्थ नेहमीच प्रोत्साहन देतात त्यामुळे शाळा नेहमीच सर्व दृष्टीने प्रगतीपथावर असते.शेवटी मुख्याध्यापक बागवे यांनी सर्वांचे आभार मानले. शाळेप्रती कर्तव्याने उज्वलाने केलेल्या मदतीचे पालक वर्गात कौतुक होत आहे.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश वंजारे, भास्कर वंजारे, सुहासिनी वंजारे, माजी सभापती सुजाता हळदीवे,उपसरपंच तन्वी मोदी, ललित चांदोस्कर,राजू राणे, विश्वनाथ जाधव, आप्पा पारकर, प्रीतम भोगले शिक्षक गोसावी मॅडम, मुख्याध्यापक बागवे मॅडम,मयुरी मेस्त्री इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शाळेतील ३५/४० विद्यार्थ्यांनी यावेळी लाभ घेतला.

error: Content is protected !!