SIR फॉर्म भरण्यासाठी पोलीस पाटील व इतर गावस्तरीय महसुल विभाग कर्मचारी यांचे सहकार्य मिळणेसाठी लेखी आदेश द्यावेत

मालवण पंचायत समिती सदस्य तथा भाजपा गटनेते दिपक सुर्वे यांचे तहसीलदार यांना निवेदन

आचरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील प्रत्येक गावात SIR मतदारांचे फॉर्म भरण्याचे (मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण) काम सध्या सुरू असुन हे फॉर्म भरून घेण्याची मुदत 30 जुलै पर्यत देण्यात आली आहे. परंतु मालवण तालुक्यातील कमी मतदार संख्या असलेल्या BLO व जास्त मतदार संख्या असलेल्या BLO ना एकसारखीच एकमहिन्याची मुदत दिलेली आहे. त्यामुळे मुदतीत काम होणे अशक्य आहे. तरी 500 पेक्षा जास्त मतदार असलेल्या BLO ला मदत करणेसाठी मालवण तालुक्यातील पोलीस पाटील किंवा इतर गाव स्तरीय महसुल विभाग कर्मचारी यांना लेखी आदेश देण्यात यावा,. या मागणीचे निवेदन मालवण पंचायत समिती सदस्य तथा भाजपा गटनेते दिपक सुर्वे यांनी मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांना दिले आहे.

error: Content is protected !!