मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत दळवी महाविद्यालयाची दमदार कामगिरी

चार विभागांचा १०० टक्के निकाल

तळेरे (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या तृतीय वर्ष पदवी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाने यंदाही उल्लेखनीय यशाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाच्या बीए (एम.एम.सी), बीबीआय,बीएमएस आणि बी.कॉम या चार विभागांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तसेच बीएएफ विभागाचा निकाल ९६.८८ टक्के, तर बीएस्सी (आय.टी) विभागाचा निकाल ९६.६७ टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात बीए.एम.एम.सी विभागातील कु. पांगम जुईली महादेव हिने ९.७३ सी.जी.पी.आय मिळवत महाविद्यालयात सर्वाधिक गुण संपादन करून प्रथम येण्याचा मान मिळविला.

विभागनिहाय गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये बीए(एम.एम.सी) विभागातून कु. पांगम जुईली महादेव (सी.जी.पी.आय ९.७३) ,बीबीआय विभागातून कु. मनस्वी मनोहर मण्यार (सी.जी.पी.आय ९.७०), बी.ए.एफ विभागातून कु. तळेकर दीक्षा मनोज (सी.जी.पी.आय ९.६८) बीएस्सी (आय.टी) विभागातून नारकर श्रुती दीपक (सी.जी.पी.आय ९.५२) बी.एम.एस विभागातून सावंत सोहम संजय – (सी.जी.पी.आय ९.२८),बी.कॉम विभागातून तसेच कु. ओवेज रिझवान काझी (सी.जी.पी.आय ८.७९), यांनी आपल्या विभागात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे माजी मानद मार्गनिर्देशक मा. विनायक दळवी, सिंधुदुर्ग उपपरिसर प्र. संचालक व दळवी महाविद्यालयाचे समन्वयक श्रीपाद वेलींग, सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत सातत्याने उत्कृष्ट निकालाची परंपरा जपत महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप उमटविली आहे.

2-7-2026
सोबत विद्यार्थ्यांच्या नावासह फोटो पाठवले आहेत.

error: Content is protected !!