कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी वैदेहीचे केले अभिनंदन
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत वैभववाडी तालुका शिक्षण संस्था, मुंबई संचलित अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थिनी वैदेही विवेकानंद कडू हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वैदेही हिने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण सर्वसाधारण विभागातून प्रथम क्रमांक मिळवत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या उज्ज्वल यशामुळे संस्था, पालक आणि संपूर्ण वैभववाडी तालुक्याचा गौरव झाला आहे. या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, प्रशालेचे मुख्याध्यापक बी. एस. नादकर तसेच बाह्य परीक्षा विभाग प्रमुख एस. व्ही. भोसले यांनी विद्यार्थिनी व तिच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण परंपरेचे हे आणखी एक मानाचे यश मानले जात आहे.

वैदेही विवेकानंद कडू












