बांदा (प्रतिनिधी) : आज दुपारी वाजताच्या सुमारास बांदा चेकपोस्ट येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई केली. पिकअप जीप (MH 07 AJ 5209) ची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूसह एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले
आरोपी अमोल लक्ष्मण चिंदरकर, वय 35, रा. कलमठ, ता. कणकवली याच्या ताब्यातील बोलेरो पिकअपमधून 4,47,240/- रुपये किमतीची गोवा बनावटीची विदेशी दारू मिळून आली. तसेच 5,00,000/- रुपये किमतीची बोलेरो पिकअप गाडी असा एकूण 9,47,240/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नवोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पालकर, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल परब यांनी ही कारवाई केली. कारवाईदरम्यान हेड कॉन्स्टेबल दादा परब, राजेश गवस व राकेश चव्हाण यांनी मदत केली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास बांदा पोलीस करीत आहेत.












