10 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान गायत्री ब्राम्हण मैदानात रंगणार क्रिक्रेटचा महासंग्राम
दीड लाख प्रथम आणि 1 लाख द्वितीय पारितोषिक सह लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात
कणकवली (प्रतिनिधी) : क्षात्रकुलोत्पन्न मराठा (गावडे) समाज, कलमठ गावडेवाडी मित्रमंडळ यांच्या वतीने भव्य क्रिकेट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय डे-नाईट क्रिकेट स्पर्धा २०२६ (वर्ष २ रे) दिनांक १० ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत उत्साहात पार पडणार आहे. ही स्पर्धा गायत्री ब्राम्हण मैदान, कलमठ गावडेवाडी, कणकवली-तरंदळे रोड येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत आकर्षक बक्षिसांची रेलचेल असून प्रथम पारितोषिक रुपये १,५०,५५५ आणि द्वितीय पारितोषिक रुपये १,००,५५५ ठेवण्यात आले आहे. याशिवाय उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.
सहभागासाठी प्रवेश फी रुपये २१,०००/- ठेवण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व क्रिकेट संघांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
स्वप्नील चिंदरकर – ९४२३५१३९५३ / ९४२२९६७७८८
शाम आचरेकर – ७७४१०३५३४६
विजय चिंदरकर – ९०६७२७९६८६
हितेश हलमलकर – ९७३०८०५००८












