नागरिकांचा उदंड प्रतिसाद तर एकाच ठिकाणी विविध दाखल्यांचे वितरण
“महाराजस्व अभियानातून नागरिकांची प्रलंबित कामे पूर्ण करणे हा उद्देश…” — तृप्ती धोडमिसे
खारेपाटण (प्रतिनिधी) : “सर्वसामान्य नागरिकांना महसुली दाखले जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी जाऊन मिळविणे खूप खर्चिक होत असल्याने नागरिकांचा वेळ व त्रास वाचवा आणि प्रशासन आणि जनता यांचा संवाद यातून साधता यावा या उद्देशाने महाराजस्व अभियानातून येथील जनतेची गेली कित्येक वर्षे व महिने प्रलंबित असलेली कामे पूर्ण करून त्यातून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण करणे.हा या अभियानाचा उद्देश असल्याचे भावपूर्ण उदगार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांनी खारेपाटण हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या उद्घघाटन प्रसंगी काढले. “
कणकवली तहसील कार्यालयाच्या वतीने खारेपाटण हायस्कूल येथील कै.चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात बुधवार दि.२५ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वा.संपन्न झालेल्या या समाधान शिबिर टप्पा क्र.१ चे उद्घघाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी विभागीय प्रांत अधिकारी जगदीश कातकर, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे,माजी जि.प.सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार,कणकवली पं.स.सदस्य श्री गुरुप्रसाद शिंदे,श्री राजेश जाधव,कणकवली तालुका संजय गांधी निराधार योजना समिती चे अध्यक्ष शरद कर्ले,खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत,खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, खारेपाटण हायस्कूल ज्युनियर कॉलेज प्राचार्य संजय सानप, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए डी.कांबळे,खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव,चिंचवली सरपंच – अशोक पाटील, कुरंगावणे सरपंच संतोष ब्रम्हदंडे,वायंगणी सरपंच अस्मि लाड,नडगीवे सरपंच माधवी मण्यार,वारगाव सरपंच नाना शेट्ये,शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ,शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये ,संजय गांधी विभाग नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, महसूल नायब तहसीलदा मुकुंद मुंडले,सहाय्यक महसूल अधिकारी संभाजी खाडे,संजय गांधी सहाय्यक अधिकारी धनंजय सिंगनाथ,खारेपाटण मंडल अधिकारी बावलेकर, खारेपाटण महसूल ग्राम विकास अधिकारी प्रवीण लुडबे,वारगाव तलाठी रविंद्र अम्रासकर,शेर्पे तलाठी अनघा अग्निहोत्री,खारेपाटण ग्राम विकास अधिकारी विशाल वरवडेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचे महसूल विभागाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात विविध महसुली शासकीय योजना व त्यांना लागणारी विविध कागदपत्रे याविषयी सविस्तर माहिती दिली.व शासन तुमच्या सेवासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले.यावेळी खारेपाटण हायस्कूल चे मुख्याध्यापक संजय सानप यांनी देखील मार्गदर्शन करून महसूल विभागाच्या जलद गतीने एकाच ठिकाणी सेवा देण्याच्या समाधान शिबिराचे अर्थात उपक्रमाचे कौतुक केले.या समाधान शिबिराच्या माध्यमातून सुमारे २०० पेक्षा अधिक नागरिकांचे विविध दाखले ऑनलाइन काढून देण्यात आले.याबद्दल नागरिकांनी महसूल प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
दरम्यान महसूल विभागाच्या वतीने खारेपाटण हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या या समाधान शिबिरात खारेपाटण मंडल मध्ये समाविष्ट असलेल्या अनेक नागरिकांना विविध महसुली दाखल्यांचे वितरण जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांचे शुभहस्ते करण्यात आले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन खारेपाटण ज्युनियर कॉलेज च्या शिक्षिका.दर्शना पाताडे तर आभार कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी मानले.तर हे शिबिर यशस्वी करण्यासाठी खारेपाटण मंडल मधील सर्व पोलिस पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.












