नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

देवगड (प्रतिनिधी) : कोकण चे भाग्यविधाते व माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळा वाडा या शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप ग्रामपंचायत सदस्य अंकिता सुहास वाडेकर व सुहास वाडेकर यांच्या माध्यमातून करण्यात आले.

स्कुल बॅगचे वाटप पंचायत समिती सदस्य अंकुश ठुकरल,रामकृष्ण जुवाटकर, उपसरपंच पडेल विश्वनाथ पडेलकर,वाडा सरपंच सुनिल जाधव,शक्ती केंद्रप्रमुख अविनाश सहस्त्रबुद्धे यांच्या शुभं हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित शशांक तावडे,सतिश परब,मनोहर परब,हर्षद जोशी,स्नेहल मिस्त्री,रवींद्र मांजरेकर,विवेक जाधव,काशिनाथ डोके,अभिजीत जाधव,योगेश परब,रामकृष्ण परब,आशिष जाधव आदी ग्रामस्थ व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते

error: Content is protected !!