कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली शिक्षण संघ, मुंबई संचलित कळसुली इंग्लिश School, कळसुली (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) फेब्रुवारी/मार्च २०२६ चा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रशालेने यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या परीक्षेसाठी एकूण ४६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळवून शाळेच्या गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली.
प्रथम क्रमांक कु. भूषण प्रमोद दळवी याने ४६८ गुण (९३.६० टक्के) मिळवत पटकावला. द्वितीय क्रमांक कु. मेघा प्रविण दळवी हिने ४४८ गुण (८९.६० टक्के) मिळवून प्राप्त केला. तृतीय क्रमांक कु. मयुरेश सुरेश धुरी आणि कु. वेदिका रघुनाथ मेस्त्री यांनी प्रत्येकी ४४५ गुण (८९.०० टक्के) मिळवत संयुक्तरीत्या पटकावला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष सूर्यकांत राजाराम दळवी, कार्याध्यक्ष -विजय पांडुरंग सावंत, सरचिटणीस- जय मारुती दळवी, सल्लागार – प्रकाश दळवी, सर्व संस्था पदाधिकारी तसेच स्कूल कमिटी चेअरमन -के. आर. दळवी, व्हाईस चेअरमन -नामदेव घाडीगावकर, सदस्य -रजनीकांत बळीराम सावंत, सदस्या – शुभदा देसाई व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष- अनिल सावंत, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष –भालचंद्र रघुनाथ दळवी व पदाधिकारी, मुख्याध्यापक -व्ही. व्ही. वगरे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक व हितचिंतक यांनी अभिनंदन केले आहे.












