व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल ची दुर्वा मूनेश वारंग बांदा केंद्रात प्रथम
बांदा (प्रतिनिधी) : येथील व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा शाळेचा यंदाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत बांदा केंद्रात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला. या शाळेचे तीन विद्यार्थी बांदा क्रेंदात आले आहेत.
यामध्ये शाळेतून प्रथम क्रमांक कु. दुर्वा मूनेश वारंग हिने ९७.२० , द्वितीय क्रमांक सुयेश संदिप गावकर ९५.४०, तृतीय क्रमांक अनुष्का रामचंद्र तेली ९५.२०, चौथ्या कु. साक्षी भूषण गवंडी, ९४.६०, पाचवा वेदा सुनील सावंत ९४.२०, सहावा सान्वी सागर राऊळ ९०.८० यांना मिळाला. यावर्षी प्रशाळेतून दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.असून शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे श्री. मंगेश कामत चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष मा. श्री.मंगेश कामत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












