अ.वि. फडणीस माध्यमिक विद्यामंदिर घोणसरीचा दहावीचा निकाल १०० टक्के

कणकवली (प्रतिनिधी) : घोणसरी ग्रामविकास मंडळ मुंबई संचलित अ.वि. फडणीस माध्यमिक विद्यामंदिर, घोणसरी विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) मार्च २०२६ चा निकाल शंभर टक्के लागला आहे. परीक्षेस बसलेल्या सर्व १८ विद्यार्थ्यांनी यश संपादन करून प्रशालेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

यामध्ये ३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य (Distinction) मिळविले असून १४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

प्रथम क्रमांक कु. पार्थिवी दिपक एकावडे हिने ९४.०० टक्के गुण मिळवत पटकावला. द्वितीय क्रमांक कु. काजल पांडुरंग दिवेकर हिने ८४.६० टक्के गुणांसह मिळविला. तर तृतीय क्रमांक कु. वैष्णवी संतोष भोपळे हिने ७७.८० टक्के गुण मिळवत प्राप्त केला.

या यशाबद्दल उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे घोणसरी ग्रामविकास मंडळ मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहचिटणीस, सर्व संचालक मंडळ व सदस्य, शालेय समिती चेअरमन व सभासद तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!