मडुरा हायस्कूल एस. एस. सी निकाल 100% खुशी मंगेश पेडणेकर प्रथम 91.40%

बांदा (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल मडुरा, एस. एस. सी मार्च 2026 परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून कु. ख़ुशी मंगेश पेडणेकर 91.40% प्रथम, कु. जगन्नाथ रामचंद्र परब 87.20% द्वितीय, कु. विठ्ठल सोमा नाईक 86.40% तृतीय क्रमांक पटकावीला. सातत्याने सलग 9 वर्षे 100% निकालाची परंपरा कायम ठेवण्यात यश प्राप्त झाले आहे. गुणवंत विद्यार्थी व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संस्था अध्यक्षा कल्पनाताई तोरसकर, कार्याध्यक्ष डाॅ. मिलिंद तोरसकर, सचिव संतोष सावंत, कोषाध्यक्ष वैभव नाईक, संस्था कार्यकारिणी सदस्या व समन्वय समिती सचिव रश्मीताई तोरसकर, समन्वय समिती सहसचिव नंदकुमार नाईक सर, तसेच सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती सदस्य, सर्व मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ, प्रशालेचे मुख्याध्यापक सायली परब मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, हितचिंतक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!