एक ठार दोन जखमी
कणकवली (प्रतिनिधी) : मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचा आज ९ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता नांदगाव ओटव ब्रिजवर भीषण अपघात झाला. डिव्हायडरला कारची जोरदार धडक बसल्याने मागील सीटवरील एका महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून पुढील सीटवरील मुलगी कारमध्ये अडकली होती ती देखील गंभीर जखमी झाली आहे. स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.












