उद्धव ठाकरे यांनी सोलगाव येथे संवाद साधला ; भाजप कार्यकर्ते आक्रमक, प्रकल्प समर्थक मोर्चावर ठाम

बारसू (प्रतिनिधी ) : कोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय धुमशान पाहायला मिळेल. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूकडे रवाना झाले आहेत. ठाकरे गटाने उद्धव ठाकरेंच्या दौ-यासाठी जोरदार तयारी केलीय. तर बारसूच्या समर्थनार्थ नारायण राणेही महामोर्चा काढणार आहेत. यात राणेंसोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि निलेश राणे व नितेश राणे सहभागी होतील.तेव्हा बारसूत ठाकरे आणि राणे आमनेसामने उभे ठाकलेले पाहायला मिळतील.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

दरम्यान भाजपच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकरल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आम्ही मोर्चा काढणारच असा निर्धार केला आहे. आम्ही मोर्चा काढणारच, अशी माहिती भाजप राजापूर तालुका अध्यक्ष अभिजित गुरव, रिफारणारी समर्थक अनिफ काजी आणि हर्षद घोसाळकर यांनी दिली आहे.

error: Content is protected !!