विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे कणकवलीत आ. वैभव नाईक व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत

कणकवली (प्रतिनिधी): विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता कणकवली येथे आमदार वैभव नाईक व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर,जिल्हा सहसंपर्क प्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,उपजिल्हा प्रमुख राजू शेटये, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, शैलेश भोगले, रामू विखाळे, उमेश वाळके,प्रमोद मसुरकर,राजू राठोड, उत्तम लोके,निसार शेख, बंडू ठाकूर ,सचिन आचरेकर,संजय पारकर,दिव्या साळगावकर, वैदेही गुडेकर, धनश्री मेस्त्री, संजना कोलते आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!