ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी हायस्कूलचा निकाल १००टक्के….!

आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी हायस्कूलचा इयत्ताचा दहावीचा निकाल १००% लागला असून दहावी परीक्षेस बसलेले सर्वच्या सर्व १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रशालेतून कु. यज्ञेश राजेश गोलतकर याने ८९.२० टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक, कु. पुष्पक पुरुषोत्तम गोलतकर याने ८२..४० टक्के गुण प्राप्त करत व्दितीय क्रमांक तर कु. सान्वी दिगंबर साळकर  हिने ८१.४०टक्के गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू, चंद्रकांत हडकर, कार्यवाह वैभव जोशी, दिपक सुर्वे, समृध्दी आसोलकर, सर्व संस्था कार्यकारीणी सदस्य, मुख्याध्यापक दगडूपंत टकले, शिक्षक वर्ग, शाळा व्यवस्थापन कमिटी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!