कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या परीक्षेत वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तम गुण संपादन करत वैभववाडी तालुक्यात आपले वर्चस्व कायम अबाधित ठेवले. व प्रशालेचा दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल १०० टक्के लावला आहे. या परीक्षेत वैभववाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या आकांक्षा अजित खाडये, द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या निहारिका विठोजी पाटील, तृतीय क्रमांक प्राप्त केलेली संपदा प्रितम जाधव तसेच पायल लिंगायत या विद्यार्थीनींना पुष्पगुच्छ देऊन वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, संचालक विजय रावराणे, शरद नारकर, व्यापारी मंडळ तालुकाध्यक्ष तेजस आंबेकर, मुख्याध्यापक बी. एस. नादकर, व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












