पंडित दिनदयाळ उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण वर्ग नियोजन बैठक संपंन्न

चौके (प्रतिनिधी) : पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण वर्ग मालवण तालुक्यात चौके या गावी दिनांक २३ व २४ मे रोजी होत असून या प्रशिक्षण वर्गा च्या नियोजनाची बैठक मालवण भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे १६ मे २०२६ रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आली. या बैठकीला भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान जिल्हा संयोजक प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विलास हडकर व मंडळातील सर्व पदाधिकारी या प्रशिक्षणासाठी जबाबदार कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशिक्षण शिबिरामध्ये जिल्ह्यातील 120 ते 140 प्रशिक्षणार्थी उपस्थित राहणार असून या प्रशिक्षणासाठी वक्ते म्हणुन राज्यस्तरीय प्रशिक्षक येणार असुन, त्या मध्ये राज्यातील आमदार, मंत्री, महाराष्ट्र राज्य प्रवक्ते व समारोपासाठी स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत त्यामुळे या प्रशिक्षणाचे नियोजन त्या ताकतीचे असावे या दृष्टीने आपण नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले. बैठकीमध्ये प्रशिक्षणार्थींची निवासाची व्यवस्था, वाहन पार्किंग व्यवस्था, भोजन व्यवस्था, चर्चासत्र, प्रमुख वक्ते, नोंदणी, प्रशिक्षण फी, स्टेज, पीपीटी, प्रदर्शनी, सांस्कृतिक कार्यक्रम, योगाभ्यास व इतर बाबींची सविस्तर चर्चा होऊन जबाबदारी निश्चित करण्यात आली. बैठक संपल्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षण स्थळी म्हणजेच चौके येथे जाऊन आढावा घेण्यात आला व पुढील नियोजन निश्चित करण्यात आले.

error: Content is protected !!