जिल्हा परिषदेत दहशतवाद विरोधी दिनी घेतली शपथ
ओरोस (प्रतिनिधी) : २१ मे हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा जिल्हा परिषदेमध्ये घेण्यात आली. “आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याव्दारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तिनिशी मुकाबला करण्याची गांभिर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवबंधूमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी जिवित आणि मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तीला प्रतिकार करु.”, असे या प्रतिज्ञेचे स्वरूप होते.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेडकर, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, रामा गवस, नितीन राऊळ, प्राची इस्वलकर, श्रावणी रावराणे, यज्ञा साळगावकर, अपर्णा सातोसकर उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.










