सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत दोन दिवसीय ‘जिल्हा प्रशिक्षण वर्गाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण २३ आणि २४ मे २०२६ रोजी चौके (ता. मालवण) येथील ‘द नैनी ग्रँड रिसॉर्ट’ येथे पार पडणार आहे. या दोन दिवसीय वर्गात विविध सत्रांच्या माध्यमातून पक्षाचे विचार, सरकारी योजना आणि संघटनात्मक विषयांवर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती आज भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंडित दीनदयाळ प्रशिक्षण महाअभियान कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आज भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी संयोजक बाळू देसाई, संध्या तेरसे आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना प्रभाकर सावंत म्हणाले, जिल्हस्तरीय प्रशिक्षण कालावधीत २३ मे रोजी पहिल्या दिवशी विविध वैचारिक सत्रांची रेलचेल असणार आहे.
शनिवारी, २३ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून या शिबिराची सुरुवात होईल. पहिल्या दिवशी खालीलप्रमाणे सत्रे आणि विषय होणार आहेत.
उद्घाटन सोहळा
(सकाळी १०:३० ते ११:००): या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, प्रदेश सरचिटणीस योगेश सागर, आमदार प्रशांत ठाकूर, प्रशिक्षण वर्ग अभियान सहसंयोजिका प्रा. वर्षाताई भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल.
सत्र १ (सकाळी ११:०० ते दुपारी १२:००): ‘देशासमोर आव्हाने व निदानासाठी आमचे प्रयत्न’ या विषयावर योगेश सागर मार्गदर्शन करतील.
सत्र २ (दुपारी १२:०० ते १:००): ‘आपल्या सरकारची योजना व त्याची अंमलबजावणी’ या विषयावर आमदार प्रशांत ठाकूर यांचे सत्र होईल.
सत्र ३ (दुपारी २:०० ते ३:००): ‘विचार परिवार’ या विषयावर श्रीम. वर्षा भोसले मार्गदर्शन करतील.
सत्र ४ (दुपारी ३:०० ते संध्याकाळी ४:००): ‘वैचारिक अधिष्ठान’ या विषयावर रविंद्र साठे हे विचार मांडतील.
सत्र ५ (संध्याकाळी ४:३० ते ५:३०): ‘कार्यपद्धती’ या विषयावर अतुल काळसेकर यांचे मार्गदर्शन होईल.
सत्र ६ (संध्याकाळी ५:३० ते ६:३०): ‘कार्यकर्ता विकास संगोपन व जबाबदारी’ या विषयावर अभिजीत सामंत संबोधित करतील.
रात्री ९:०० ते १०:३० या वेळेत कार्यकर्त्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
२४ मे रोजी दुसऱ्या दिवशी सोशल मीडिया आणि बूथ व्यवस्थापनावर भर
रविवारी, २४ मे रोजी सकाळी ८ वाजता नाश्त्याने दिवसाची सुरुवात होईल. त्यानंतर संघटनात्मक आणि तांत्रिक बाबींवर महत्त्वपूर्ण सत्रे होतील:
सत्र ७ (सकाळी ९:०० ते १०:००): ‘इतिहास आणि विकास’ या विषयावर प्रमोद जठार मार्गदर्शन करतील.
सत्र ८ (सकाळी १०:०० ते ११:००): ‘कार्यविस्तार’ या विषयावर डॉ. विनय नातू आणि श्री. जयंत जाधव हे मार्गदर्शन करणार आहेत.
सत्र ९ (सकाळी ११:३० ते दुपारी १२:३०): सध्याच्या डिजिटल युगाचा विचार करता अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘सोशल मीडिया, AI, नमो ॲप, सरल ॲप आणि मीडिया व्यवस्थापन’ या विषयावर नवनाथ वन हे मार्गदर्शन करणार आहेत.
सत्र १० (दुपारी १२:३० ते १.३०): ‘बूथ व्यवस्थापन’ या विषयावर राजेश शिरवाडकर यांचे सत्र होईल.
सत्र ११ (दुपारी २:३० ते ३:३०): ‘व्यवहारिक सत्र’ या विषयावर श्रीम. श्वेता कोरगावकर व त्यांची टीम संवाद साधेल.
दिग्गजांच्या उपस्थितीत समारोप
दुपारी ३:३० ते ४.३० या वेळेत या दोन दिवसीय जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा समारोप सोहळा संपन्न होईल. या समारोप सत्राला भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार प्रमोद जठार, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वीतेसाठी भाजप जिल्हा आयटी टीमचे श्रीकृष्ण परब आणि इतर पदाधिकारी मेहनत घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहावे, असे आवाहन पक्ष संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.










