खारेपाटण हायवे ते कालभैरव मंदिर मार्गे सम्यक नगर कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कपिलेश्वर वाडी व कालभैरव मंदिर मार्गे बाजारपेठ मधून बंदरगाव व सम्यक नगर कडे जाणाऱ्या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली असून जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आख्यारित येणाऱ्या या रस्त्याकडे संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी देखील दुर्लक्ष केल्याचे दिसत असून यामुळे ग्रामस्थामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरून आलेला हा रस्ता महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्या अंतर्गत येत असून वारंवार या रस्त्याबाबत खडीकरण व डांबरीकरण करून देण्याची मागणी नागरीकाकडून करण्यात येते.मात्र खारेपाटण व कणकवली PWD कार्यालयाकडून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती बाबत कोणतीच हालचाल केलेली दिसत नाही. सध्या या रस्त्यावर ठीक ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याला साइड पट्टी तसेच पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी गटारे नसल्यामुळे भर पावसात पाणी या रस्त्यावरूनच वाहताना दिसत असून याचा नागरिकांना त्रास होत आहे.याबाबत खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य जयदीप देसाई यांनी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देखील ही बाब निदर्शनास आणून दिली असून महा मार्गावरुन पावसाचे थेट पाणी या रस्त्यावरून नागरिकाच्या घरच्या अंगणात येत असल्याचे चित्र आहे. तरी या हायवे मध्ये बाधित झालेल्या या रस्त्याच्या कामाचे खडीकरण व डांबरीकरण तातडीने करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.

खारेपाटण हायवे ते कालभैरव मंदिर मार्गे सम्यक नगर कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झालेली दिसत आहे.

error: Content is protected !!