जिल्ह्यातील रक्तटंचाई दूर करण्यासाठी बांद्यात रक्तदान मोहीम
बांदा (प्रतिनिधी) : जागतिक रक्तदाता दिनानिमित्त बांदा येथील आनंदी मंगल कार्यालयात रविवार दिनांक १४ जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयासह विविध रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. हे रक्तदान शिबिर श्री स्वराज्य प्रतिष्ठान, बांदा, सार्वजनिक नवरात्रोत्सव व कला-क्रीडा मंडळ, कट्टा कॉर्नर बांदा, ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शाखा बांदा यांचे सहकार्य लाभले आहे.
रविवारी सकाळी ८.३० ते दुपारी १ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. रक्तदानासाठी इच्छुकांनी ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे अध्यक्ष दयानंद गवस (मो. 9821444170), सार्वजनिक नवरात्रोत्सव व कला-क्रीडा मंडळाचे नाना शिरोडकर (मो. 9767577774) व साई काणेकर (मो. 9923042242) तसेच ज्येष्ठ नागरिक विकास मंचचे सचिव गुरुनाथ नार्वेकर (मो. 9422379346), कमलाकर धुरी (मो. 8999804404) आणि समीर परब (मो. 9823830119) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.












