स्वच्छ गाव, सुरक्षित हवामान अभियानांतर्गत बेळणे खुर्दमध्ये स्वच्छता मोहीम…!

कणकवली (प्रतिनिधी) : शासनाच्या स्वच्छ गाव, सुरक्षित हवामान या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत बेळणे खुर्द यांच्या वतीने दि. ४ जून २०२६ रोजी गावात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांच्या सहभागातून ही मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
मोहीमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणे, रस्ते व परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश दिला.

यावेळी सरपंच अविनाश गिरकर, उपसरपंच पंढरीनाथ चाळके, ग्रामपंचायत अधिकारी वैभव ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य अंकिता चाळके, संघवी तांबे, राजेंद्र चाळके, सिद्धार्थ तांबे, ऑपरेटर सायली जाधव, आशा सेविका शशिकला तांबे, बचत गट प्रतिनिधी योगिता तांबे तसेच ग्रामस्थ प्रसाद चाळके, साहिल चाळके, सागर चाळके आणि प्रेमलता लाड उपस्थित होते.

error: Content is protected !!