नळपाणी देखभाल दुरुस्ती ठेकेदाराला मागील 4 वर्षात दिले नाहीय पेमेंट
देवगड (प्रतिनिधी) : देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या हददीमध्ये गेल्या चार वर्षामध्ये नळयोजना देखभाल दुरूस्तीचे काम पाहणाऱ्या ठेकेदाराला कामाचे कुठलेही देयक आदा करण्यात आले नाही ही वस्तुस्थिती खुद्द ठेकेदारांनीच पाणीप्रश्नाच्या विशेष सभेत मांडली. मागील कामाचेही बील पुर्ण दिले नसल्याचे सांगत पैसे नसल्यास काम कसे करणार असा प्रश्न ठेकेदारांनी सभेत उपस्थित केला. देवगड जामसंडे वासियांना सोमवारपासून सुरळीत पाणीपुरवठा होईल असे नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी सांगीतले.
देवगड जामसंडे नगरपंचायतीची पाणीप्रश्नाबाबत विशेष सभा मंगळवारी नगरपंचायतीच्या सभागृहात नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्षा मिताली सावंत, मुख्याधिकारी संतोष जिरगे, पाणीपुरवठा सभापती संतोष तारी, बांधकाम सभापती तेजस मामघाडी, स्वच्छता सभापती विशाल मांजरेकर उपस्थित होते.
देवगड जामसंडे या दोन्ही शहरांचा पाणीप्रश्न गंभीर झाला असून नागरिकांना चार-चार दिवसांनी पाणीपुरवठ होत आहे. पाणी सुरळीत मिळेल याबाबत नगरपंचायतीने काय नियोजन केले याची माहिती द्यावी अशी मागणी भाजपा गटनेते शरद ठुकरूल व नगरसेविका प्रणाली माने यांनी केली.
यावेळी पाणीपुरवठ। विभागामार्फतत पाणी खेचण्याची मुख्य मोटर बंद असल्याने दुरूस्तीसाठी देण्यात आली आहे सध्या पर्यायी मोटार बसविण्यात आली आहे मात्र त्याद्वारे पाणी कमी खेचले जाते असे सांगण्यात आले. पाण्याची एवढि गंभीर समस्या का निर्माण झाली असा प्रश्न नगरसेविका माने यांनी उपस्थित केला. यावर नगरसेवक बुवा तारी यांनी गतवर्षी पाऊस पडल्यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली नाही असे सांगीतले.
ठेकेदार बिपीन कोरगांवकर यांनी मागील कामाचे बील मे २०१९ मध्ये अदा करण्यात आले ते सुध्दा पुर्ण दिले नाही. यावर नगरसेविका प्रणाली माने यांनी त्यानंतर दोनदा बील देण्यात आले असे सांगीतले यावर कोरगावकर यांनी मे महिन्यात झालेले २९ लाखाचे बील हे त्यानंतर टण्याप्याने पाचवेळा देण्यात आले. १ जुनपासून आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही देयक अदा करण्यात आले नाही. दोन महिने पगार नसल्यास नगरपंचायतीचे कर्मचारी आंदोलन करतात. माझा ६ कर्मचाऱ्यायांना चार वर्षे पगार देणे अशक्य झाले आहे असे कोरगांवकर यांनी सांगीतले. पैसे नसल्यास काम कसे करणार. मागील कामाचे बील पुर्ण अदा करावे अशी मागणी त्यांनी केली. यावर पाणीपुरवठ। सभापती संतोष तारी यांनी नवीन टेंडर प्रमाणे सुरू असलेल्या कामाचे बील अदा करण्यात येईल.पंपींग यंत्रणा लवकरात लवकर दुरूस्त करून पाणीपुरवठ। सुरळीत करावा अशी सुचना ठेकेदाराला केली. दोन तीन दिवसात पंप दुरूस्त करून सोमवारपासून पाणीपुरवठ। सुरळीत हाइल असे कोरगावकर यांनी सांगीतले.












