सेवाज्येष्ठतेचा निर्णय ११ महिने प्रलंबित; सहाय्यक शिक्षकाचे जि.प.समोर बेमुदत उपोषण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सेवा जेष्ठतेचा निर्णय तब्बल ११ महिने प्रलंबित ठेवल्याने सेट म ग हायस्कूल देवगडचे सहाय्यक शिक्षक भीमराव येडगे यांनी आज पासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे

जि.प. समोर सहाय्यक शिक्षकाने ऐन गणेशोत्सव काळात आमरण उपोषण सुरू केल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .
सेवाज्येष्ठतेचा निर्णय तब्बल ११ महिने प्रलंबित ठेवल्याने एका शिक्षकाला जिल्हा परिषदेच्या दारात आमरण उपोषणाला बसावे लागले आहे. ही घटना शिक्षण विभागाच्या दिरंगाई कारभाराचे चित्र स्पस्ट करणारे आहे.

देवगड तालुक्यातील सेठ म.ग. हायस्कूलमध्ये २००२ पासून कार्यरत असलेले सहाय्यक शिक्षक भिमराव येडगे यांचे म्हणणे आहे की, त्यांना डावलून त्यांच्यानंतर रुजू झालेल्या कनिष्ठ महिला शिक्षकाला पर्यवेक्षक बनवण्यात आले. हा प्रकार बेकायदेशीर आहे.
याविरोधात त्यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये माद्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे दाद मागितली. शिक्षणाधिकाऱ्यांनी सुनावणीही घेतली, पण सुनावणी होऊन ११ महिने झाले तरी निर्णय दिला नाही. आज देतो, उद्या देतो असे सांगून वेळ मारून नेली जात असल्याचे येडगे यांचे म्हणणे असून यामुळे त्यांचे एक वर्षाचे प्रमोशन आणि आर्थिक लाभ बुडाला आहे.अखेर न्याय न मिळाल्याने त्यांनी आज १५ सप्टेंबरपासून जिल्हा परिषद समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. “माझा मानसिक छळ थांबवा आणि सेवाज्येष्ठतेनुसार मला न्याय द्या,” अशी त्यांची मागणी आहे.

error: Content is protected !!