कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचा जाहीर निषेध

मागासवर्गीय शिक्षकाना शिवीगाळ व अपमान करणाऱ्या कातकर यांचे तात्काळ निलंबन करावे

माजी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांची मागणी

ओरोस (प्रतिनिधी) : देवगड येथे शासनाचा प्रशिक्षण कार्यक्रम होता त्यात अनेक शिक्षक सहभागी झाले होते. त्यात मागासवर्गीय शिक्षक जयेंद्र चव्हाण हेही सहभागी झाले होते. दुपारी प्रशिक्षण वेळी त्यांनी आपली अडचण, समस्या तेथे व्यक्त केली. याचा राग तेथे उपस्थित असलेले कणकवली प्रांत कातकर यांना राग आला व त्यांनी शिक्षक चव्हाण यांना काही कारण नसताना हरामखोर अशी शिवी दिली आणि कोठे तक्रार करायची तेथे करा असे सुनावले. वास्तविक पाहता कातकर यांचे हे वर्तन अधिकारी म्हणून शोभनीय नाहीच. तसे पाहता त्यांनी उपस्थित शिक्षकांचे म्हणणे किंवा प्रशिक्षण ब्रेक न घेता सुरू असल्याने काहीना शारीरिक किंवा आरोग्याच्या तक्रारी तर नसतील ना या बाबत विषय समजून घ्यायला हवा होता. चव्हाण यांना त्रास झाल्याने त्यांनी समस्या मांडली हे चुकीचे नव्हते. शारीरिक किंवा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन शिक्षकांना त्रास झाला असता तर याची जबाबदारी कोणी घेतली असती. प्रांत कातकर यांनी विषय समजून न घेता अधिकार पदाचा गैरवापर करत सर्वा समक्ष एका मागासवर्गीय शिक्षकाचा हरामखोर अशी शिवी देत अपमान केला आहे. यांची गंभीर दखल संघटनांनी घेतली आहे. आम्ही याबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची भेट कातकर यांची तक्रार करणार असून त्यांना निलंबित करावे अशी मागणी करणार आहोत. हे प्रकरण दुर्लक्ष करण्यासारखे आहे. कातकर यांनी दिलेल्या वागणुकीमुळे वंचित समाज व शिक्षक वर्गात नाराजी आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी यांनी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्याकडे सर्व समाज बांधव मिळून कातकर याची तक्रार करणार आहोत अशी माहिती भाजपा अनुसूचित जाती मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांनी दिली.

error: Content is protected !!