नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत वह्या वाटप कार्यक्रम
कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी प्रशालेत गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी वह्यांचे वितरण करण्यात आले.
युवा संदेश प्रतिष्ठाण- नाटळ,सांगवे आयोजित नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त व शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी, शैक्षणिक क्षेत्रातील आधारवड, जिजाऊ सामाजिक संस्था, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सालाबादप्रमाणे याही वर्षी इयत्ता दहावी आणि बारावी मधील प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा डिजिटल वॉच देऊन त्यांचा गुण गौरव करण्यात आला तसेच प्रशालेतील एकूण ७५० विद्यार्थ्यांना प्रत्येकी अर्धा डझन वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. युवा संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश सावंत,(संचालक, क.ग.शि.प्र. मंडळ, मुंबई) प्रशालेचे माजी विद्यार्थी, भिरवंडे गावचे सुपुत्र, कार्यक्रमाचे सर्वेसर्वा यांच्या उदात्त हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,आपण ज्या शाळेत शिकलो ज्या समाजातून आलो त्या समाजाचे आपण देणे लागतो. त्यासाठी शैक्षणिक,सामाजिक, कला, क्रिडा, सांस्कृतीक, एस.टी.एस स्पर्धा परीक्षा यांच्या माध्यमातून अविरतपणे समाज कार्य व प्रयत्न युवा संदेश प्रतिष्ठान नेहमीच अग्रक्रमाने करत असते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबई संचालक व्ही.बी.सावंत,शालेय समिती खजिनदार गणपत सावंत, शालेय समिती सदस्य अशोक कांबळे, पंचायत समिती सदस्य राजश्री पवार विजय भोगटे,सुनील घाडीगावकर- सरपंच नाटळ, संजय सावंत- सरपंच सांगवे,मंगेश बोभाटे- सरपंच गांधीनगर, प्रफुल्ल काणेकर, प्रदीप सावंत,मिलिंद गांवकर, नितीन गांवकर, संतोष घाडीगावकर- सरपंच दिगवळे, चंदू शिरसाट, नवनियुक्त केंद्रप्रमुख श्री.बोभाटे आदी मान्यवर तसेच युवा संदेश प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, पंचक्रोशीतील सरपंच,उपसरपंच,सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बंधू, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी तर उत्कृष्ट सुत्रसंचालन व आभार सहा.शिक्षक प्रसाद मसुरकर यांनी केले.











